श्रीशिवभारत

शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन आहे. कै. सदाशिव महादेव दिवेकर यांनी इ.स. १९२७ मध्ये त्या ग्रंथाची संहिता मराठी अनुवादासह प्रकाशित केली. परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. परमानंदाने शिवभारत कधी रचले याचा ग्रंथात उल्लेख केलेला नाही.
आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे असे समजण्यास हरकत नाही. एकूणच, शिवभारत हा ग्रंथ शिवचरित्राच्या आणि इतिहासाच्या अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त आहे.

लेखक: कवी परमानंद
संपादक सदाशिव महादेव दिवेकर
प्रकाशन: २२.०९.२०१८
किंमत: ४००/- रुपये
Purchase: Sahyadri Books, FlipKart, Amazon