किल्ले कंधार व राष्ट्रकूटकालीन शिल्पवैभव

राष्ट्रकूट काळातील एक महत्वाचे केंद्र म्हणून कंधार या नगराचा उदय झाला. इ.स.च्या चौथ्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत हा विकास चालू होता. राष्ट्रकूट कृष्ण दुसरा याने जलत्तुंग जलाशय निर्माण केला.येथे बौद्ध, जैन व हिंदू कला सारख्याच प्रमाणात विकसित झाल्या.

मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय सत्ताकेंद्र व स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने कंधार किल्ल्याचा विकास करण्यात आला. येथे खिलजी, तुघलक, बहामनी, दिल्लीची मुघल सत्ता, हैदराबादचा निझाम यांच्या अस्तित्वाची साक्ष देणाऱ्या वास्तूंविषयीचे तपशील व शिलालेखांच्या नोंदी यांच्यामुळे हे एक उपयुक्त पुस्तक ठरते

लेखक: डॉ. अरुणचंद्र पाठक
प्रकाशन: 27.03.2018
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart