मराठा आरमार-एक अनोखे पर्व

भारतीय इतिहासाशी निगडीत अनेक पैलूंपैकी भारताची उज्ज्वल नाविक परंपरा एक महत्वाचा पैलू असला तरीही स्थानिक भाषांमध्ये या विषयी मर्यादित स्वरूपात लेखन आपल्या समोर येते. या नाविक परंपरेविषयी अनेक संदर्भ आढळत असले तरीही कुठेही 'लढाऊ नौदल' असा उल्लेख क्वचितच आढळतो.
युरोपिय व्यापारी शक्ती भारतीय किनाऱ्यावर आल्या आणि भारताच्या इतिहासातील एका नवीन पर्वाची सुरवात झाली. आधी व्यापार आणि नंतर स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करत आपला जम बसवण्यास सुरवात केली. हे साध्य करण्यासाठी त्यांच्याकडे होते ते प्रबळ आरमार जे त्याकाळी कुठल्याही भारतीय सत्ताधीकाऱ्याजवळ नव्हते. परंतु ह्या आरमारी शक्तींना आपल्या मर्यादेत ठेवण्याचे महत्वाचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या आणि नंतर आंग्रे घराण्याने विकसित केलेल्या स्थानिक, लहान पण सक्षम अशा मराठा आरमाराने केले. मराठा आरमारचा अंत १७५६ मध्ये झाला आणि भारत आपले स्वातंत्र्य पुढील २०० वर्ष पारतंत्र्याच्या अंधारात बुडून गेला.

मराठा अरमारावरील ह्या पुस्तकात कुठलीही ही कथा सांगितलेली नसून, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या मराठा आरमारापासून आंग्रे घराण्याचे आरमारातील योगदान आणि पेशवे कालीन आरमार याशिवाय आरमाराचे संघटन, जहाजे, तोफा, नाविक युद्ध तंत्र याविषयी इतिहासाशी प्रामाणिक राहून विस्तृत माहिती देऊन शेवटी त्याची मीमांसा करण्यात आलेली आहे.

लेखक: डॉ. सचिन पेंडसे
प्रकाशन: १७.०२.२०१७
किंमत: ५००/- रुपये
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart